गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयामध्ये श्रीमती सुशीलादेवी म.देसाई युवती सचेतना फौंडेशन........
कोल्हापूर : गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयामध्ये श्रीमती सुशीलादेवी म.देसाई युवती सचेतना फौंडेशन आणि मा. दौलत देसाई मित्र परिवाराच्या वतीने अतिशय जल्लोषपूर्ण व संगीतमय वातावरणात झालेल्या मिस गोखले स्पर्धेत सोनल पाटील हिणे मिस गोखले चा मानाचा किताब मिळवला .संगीताच्या तालावर ,थिरकत्या नृत्या बरोबर स्पर्धेमध्ये रॅम्प वॉक ,नृत्य ,ओळख परिचय ,टॅलेंट राऊंड ,जी.के. व मनोगत राऊंड आधी प्रकारांमध्ये स्पर्धा अटीतटीची झाली.या स्पर्धेमध्ये एकूण 22 स्पर्धकांनी भाग घेतला होता. टॅलेंट राउंड मधून 22 स्पर्धकांपैकी एकूण 13 स्पर्धक निवडण्यात आले त्यानंतर जी.के. राऊंडमध्ये मध्ये या 13 स्पर्धकांना मधून 7 स्पर्धकांची निवड करण्यात आली. शेवटी मनोगत राऊंड मधुन 7 स्पर्धकांपैकी 3 स्पर्धकांची निवड करण्यात आली.
सुशिलादेवी देसाई युवती सचेतना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.मंजिरी मोरे-देसाई, स्मिता खामकर ,अनुराधा पित्रे यांच्या हस्ते सोनलला मिस गोखले मानाचा किताब, मुकुट, पुष्पगुच्छ ,स्मृतिचिन्ह व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. अनुक्रमे फर्स्ट रनर मृणाल गायकवाड , सेकंड रनर साक्षी गायकवाड यांची निवड झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक, परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक, गायत्री कुपेकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. आदरणीय डॉ. मंजिरी मोरे-देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्मिता खामकर, डॉ. मंजिरी मोरे- देसाई, मा. सई पंडित यांनी काम केले.
Leave A Comment